MCA NEWS LETTER MAGAZINE




आई


आई-बाबांची माया ती निराळीच असते .
म्हणूनच आई झाल्या नंतर हि मला ,
माझ्या आईची ऊब हवी असते.
नेहेमीच स्वतःचीच झीज करून ,
आपली गरज भागवत असते…
कारण त्यांची माया हि अपरंपार असते ….
आपल्या भोवती त्यांनी त्यांचे
आयुष्य गुंडाळलेले असते…
आणि त्यातच त्यांनी त्याचं
अस्तित्व गुम्फवलेले असते …
या बरबटलेल्या जगामध्ये
एकच निरागस मायेच छत्र असत ,
आणि ते फक्त आपल्या आई-बाबांचं असत …

-पुजा घुगे
(SYMCA)