MCA NEWS LETTER MAGAZINE





काँलेज डे'ज ..


काँलेज डेज म्हटले कि विद्यार्थांसाठी एक पर्वणीच असते. वर्षभर चालणारे लेक्चर, ईक्झाम, वर्कशाँप, असाईंनमेंट यातून एक, मनाला अतिशय समाधान देणारा हक्काचा ब्रेक. या डेज चा कार्यक्रम खरा तर एक हप्ताभर असतो. यात ट्रेडीशनल, फिल्मी, होरर, साडी आणि ईतर डे'ज; पण याच काळात हे काँलेज चे विश्व अगदी वेगळ विश्व भासतं, याच काळात ऊत्साही विद्यार्थी आपल्या डेज च्या शेड्यूल नूसार हवा तो गेटअप करून, अगदी नटून थटून, एकदम "टकाटकच" प्रत्येक जण स्वत:ला ईतरांपासून वेगळं आणि क्रिएटीव, सुंदर कस दिसता येईल याचा प्रयत्न करत असतो. एक वेळ परिक्षेच वेळापञक लक्षात राहत नाही पण डेज चे वेळापञक माञ हे प्रत्येकाच पाठ असत. ऊद्या कुठला डे आहे आणि ऊद्या कुठले कपडे घालायचे त्याची तयारी हि आदल्या दिवसा पासूनच सुरू होते. ते कपडे अरेंज करणे शुज अरेंज करणे, मिञांना फोन करून विचारणे कि बाबा असे कपडे किवा असा गेटअप आहेत का तुझ्या कडे, आणि जर अँडजस्ट नाही झाले तर मग रेंट वर घेऊन येणे. सर्व तयारी झाली कि लेक्चर ला एक वेळ लेट येणार पण डेजला माञ बरोबर वेळेत येणार. आणि काँलेज ला आले कि मग सर्वञ विविध रंगांची रेलचेल. अक्षरश: डोळे सुधा तृप्त पावतात भन्नाट कपडे परीधान केलेली मंडळी पाहून. प्रत्येक जण सजलेला असतो. आणि त्या सुरू असलेले ते फोटो सेशन नाना प्रकार च्या पोजेस देऊन फोटो सेशन चालू असते. आणि लगेचच ते फोटो सोशल साईट्स वर अपलोड करण्याचा जणू ट्रेंडच बनतो. मुलींसाठी डेज म्हटले तर आवडती साडी, नाही तर आवडता ड्रेस त्याला मँचिंग अँक्सेसरीज, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "मेकअप" मी तिच्यापेक्षा अजून किती सुंदर दिसेल याचा प्रयत्न असतो. आणि प्रामाणिक पणाने म्हटले तर डेज मधे खरी जान हि या स्री-वर्गातून आलेली असते या डेज मधे प्रत्येक मुलगी सुंदर दिसत असते तिची साडी तिचे हेअर स्टाईल मँचिग अँक्सेसरीज या अजूनही त्या मुलीची शोभा वाढवत असतात. आणि याच काळात फोटो स्टुडीयो मधे जाऊन फोटो काढणे नाय तर आपल्या फोन्स मधे. आणि ते फोटो आपल्या घरच्या मंडळींना दाखवण्याचा बेत आणि त्यात येणारी मजा हि माञ वेगळीच . या सर्वांचा शेवट होतो तो एका सोहळ्याने, ज्यात नृत्य वकृत्व, प्रमुख पाहुणे यांचे भाषण, त्याच प्रमाणे विविध कलागुण दाखवून आपल्या कलेच्या जोरावर विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थ्यांची दाद मिळवतात. याच सोहळ्यात खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात येते. आणि या सोहळ्याचा शेवट होतो तो प्रमुख पाहुणे प्रिन्सिपल सर आणि इतर शिक्षक वर्ग यांच्या उत्स्पुर्त भाषणाने. आणि मग शेवट होतो तो ‘कॉलेज’ डे’ज चा ..

                                         - चेतन ठाकरे